महाराष्ट्र
22002
10
जलजीवन मिशन योजना निविदेतील अपहाराची चौकशी करून कारवाई
By Admin
जलजीवन मिशन योजना निविदेतील अपहाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जलजीवन मिशनच्या निविदा प्रक्रियेतील अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या दूरदृष्टीतुन साकारलेली हर घर जल म्हणजेच जलजीवन मिशन.आपल्या जिल्ह्यात अनेक गावांत जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे कामे मंजूर आहेत.काही सुरू आहेत, काही पूर्ण झाले.या मध्ये जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण आशा दोन विभागाचे अधिकारी याचे काम बघतात.कामाची निविदा प्रक्रिया करणे,कामावर देखरेख ठेवण बिलअदा करणं असे कामे करताना अनेक निविदा प्रक्रियेत मनमानी अटी शर्ती लादून,कार्यरंभ आदेश देताना बेकायदेशीर पणे सलगीतल्या ठेकेदारांनाच देणे,योग्य निवड झालेला ठेकेदार हेतुपूर्वक डावलने असे प्रकार सध्या सुरू आहेत.यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केला जात असल्याने या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अही मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६ ते ८ महिने कार्यरंभ आदेश न देणे,निविदा फाईलच अनेक दिवस गहाळ असने,त्यावर खाजगी संगणक चालकांच्या (जिल्हा परिषद,पंचायत समिती
ग्रामपंचा यतचे बेकायदा टेंडर करणारे) यांच्या तक्रारी वर तोडपाणी करून मग ती निविदा फाईल मुख्य प्रक्रियेत आणून त्यातही राजकीय हस्तक्षेप विचारात घेऊन कार्यरंब देणे,तसेच ठेकेदारांची आर्थिक पात्रता नसताना अनेक कामे,एका च ठेकेदाराला टक्केवारीवर ठरवून दिले आहेत.समनधित ठेकेदार प्रत्येक कामावर एकाच वेळी उपस्थित राहू शकत नसल्याने त्याने स्वतःच्या नाववरील कामे कमिशनर अकुशल व्यक्तीस बहाल केली.अनेक ठेकेदारांनी बनावट अनुभव दाखले बनून निविदा भरल्या,अनेकांनी बनावट आर्थिकस्थिती दर्शवणारे खाजगी लेखा परिक्षकांचे दाखले जोडलेत,कार्यरंभ आदेश घेताना बैकेची हमीपत्र देखील स्वतः च्या नावाचे दिले नाहीत.ते देखील इतरांच्या खात्या तून अथवा संगणकावर बनून डुप्लिकेट,कॉफीपेस्ट करून दिलेले आहेत.त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करताना क्रमवारी प्रमाणे काम सुरू न करता तसेच सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या न घेता आधी पाण्याचा शासवत उदभव न करता (विहीर,पाझर/साठवण तलाव,विंधन विहीर,पाण्याची टाकी,)थेट फक्त पाईप खरेदी करणे,त्याचे धावते बिल काढणे व ते पाईप साईडवर खोदाई करुन मातीआड करणे.हाच एकमेव उधोग जलजीवन मिशनच्या कामावर चालू आहे.खोदाई करताना रस्त्याच्या कडेला योग्य अंतर न सोडता बांधकाम विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अनेक ठिकाणी रस्ते तोडून फोडून काम सुरू आहे.यामध्ये खोदाई
करुन मातीआड करणे.हाच एकमेव उधोग जलजीवन मिशनच्या कामावर चालू आहे.खोदाई करताना रस्त्याच्या कडेला योग्य अंतर न सोडता बांधकाम विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अनेक ठिकाणी रस्ते तोडून फोडून काम सुरू आहे.यामध्ये खोदाई झाल्यावर पण मधेच धावते बिल काढले जाते.त्यात माती काम असेल तरी कठीण खडक दाखवून निम्यात तुम्ही निम्यात आम्ही या तत्वावर बिल काढले जाते.विशेष म्हणजे पाईप जमिनित टाकल्या नंतर त्यातून पाणी प्रवाहित न करता त्याची उच्चदाब चाचणी (हैड्रोटेष्ट)न घेता धावते बिल देण्यात येते.असे बिल काढून जलजीवन काम प्रगतीपथावर दाखवले जात आहे.असले घाणेरडे प्रकार जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र् जीवन प्राधिकरण अहमदनगर कार्यालये राबवित आहेत.या निवेदनाद्व्यारे आपल्याकडे विनंती आहे की आपण जलजीवन मिशन चे प्रमुख आहात.आपल्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात ही योजना गावागावात राबविण्यातयेत असून वरील नमूद प्रकार हा योजनेतील पैशाचा अपहार आहे.या सर्व सावळ्या गोंधळात स्वतः लक्ष घालून जिल्हा परिषद अहमदनगर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांची आपल्या विभागांर्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर दंडात्मक निलंबनाची कारवाई करावी.आर्थिक देयके बेकायदा आढळल्यास अधिकाऱ्यांच्या पगारातून
वसुली करावी अशी विनंती अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.वरील सर्व तक्रारची दखल घेताना,किंवा कारवाई होत नाही असे निदर्शनास येताच सर्व पुरावे घेऊन जिल्ह्याव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल.निवेदनावर नितीन पटारे (जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय छावा अ नगर), सचिन खंडागळे (जिल्हा प्रमुख विध्यर्थी आघाडी), महेश चव्हाण (शहर अध्यक्ष), किशोर शिकारे (जिल्हा संपर्क प्रमुख), गणेश गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण)सौरभ मेढे आदींच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती मुख्यसचिव ग्रामीण पाणी पुरवठा व स्वछता विभाग मंत्रालय मुंबई,विभा गीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक,पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Tags :
22002
10





