दुहेरी हत्याकांडात मुख्य आरोपीला जन्मठेप, १३ जणांची, जिल्हा न्यायालयाचा निकाल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राजकीय वर्चस्वातून जामखेड शहरात योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोन तरुणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड या आरोपीला जन्मठेप आणि दहा हजार दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी हा निकाल दिला. मात्र इतर आरोपींची सुटका करण्यात आली.
जामखेड शहरात 28 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती. दोन राजकीय गटात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. राजकीय शुभेच्छांचा पोस्टर फाडल्याच्या रागातून एका हॉटेलात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गायकवाड वगळता इतरांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. तत्कालीन
पोलिस उपधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्ष दर्शीसह पोलिस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले.