महाराष्ट्र
21134
10
युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत ज्ञानेश्वर यांचा आदर्श घ्यावा.-
By Admin
युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत ज्ञानेश्वर यांचा आदर्श घ्यावा.- अँड.प्रतापकाका ढाकणे
शेवगाव- बोधेगाव - प्रतिनिधी
आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालय, बोधेगाव येथे संघर्षयोद्धा श्री. बबनरावजी ढाकने केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.प्रतापकाका ढाकणे यांनी युवा परिसंवाद यात्रे अंतर्गत महाविद्यालयातील युवकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के फसले सर हे होते तसेच व्यासपीठावर डॉ. भागवत राशिनकर श्री. आयुबभाई शेख व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनिल पडोळे हे होते.
अँड.ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज सर्वात जास्त सुशिक्षित तरुणांची संख्या भारतामध्ये आहे परंतु युवकांमध्ये अनेक ज्वलंत समस्या निर्माण झालेल्या असून त्यांना सामोरे जाताना सुशिक्षित करून नैराश्याच्या आहारी जाऊ नये याकरिता युवकांनी लक्ष द्यायला हवे सकारात्मक विचार करावा. जीवनात आई वडील आणि शिक्षक यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे युवकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन सकारात्मक विचारांनी अधिक सूकर कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आजचा तरुण उच्चशिक्षित आहे परंतु त्याच्यापुढे बेरोजगारीने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु युवकांनी निराश नावाचा आपल्यामध्ये विविध कौशल्य वाढीस लावली पाहिजे आणि आपले जीवन आनंददायी केले पाहिजे यासाठी उदाहरणे देताना ढाकणे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन प्रत्यक्षात स्वराज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे त्यांनी श्री संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण दिले की ज्ञानेश्वरांनी जर ज्ञानेश्वरी ची निर्मिती केली नसती तर आपणास आजचा दिवसही पाहण्यास मिळाला नसता.युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत ज्ञानेश्वर यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपले जीवनात सकारात्मक बदल घडविला पाहिजे व आपले जीवन समाज उपयोगी कसे होईल याकडे लक्ष देऊन आनंददायी जगले पाहिजे.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एम के फसले सर यांचे भाषण झाले त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ढाकणे यांनी सुरू केलेला युवा परिसंवाद यात्रेचे कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक वर्ग सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनिल पडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. भागवत राशिनकर यांनी केले.
Tags :
21134
10





