महाराष्ट्र
1333
10
छत्रपती शिवरायांनी जिव्हाळयांनी मावळे जोडलेले होते
By Admin
छत्रपती शिवरायांनी जिव्हाळयांनी मावळे जोडलेले होते. चंद्रकांत महाराज लबडे
पाथर्डी- प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मावळ्यांची निष्ठा महत्वाची होती असे निष्ठावंत मावळे शिवरायांनी धनाने नाही तर मनाने जोडलेले होते असे उद्गागार मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांनी काढले
पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सैदापूर ग्रामस्थ व हतराळ शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर टकले यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला त्याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ कृषीराज टकले पाटील मार्गदर्शन केले, याप्रसंगी शिवपुजन मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, पत्रकार अमोल म्हस्के, संभाजी बडे, नामदेव काकडे, दादा साहेब शिवणकर आदिंची भाषणे झाली स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ कृषीराज टकले पुढे म्हणाले की, शिवरायांचे काळात शेतकरी आत्महत्या होतच नव्हत्या त्यावेळी शेतकरी खरंच राजा होता जलसंधारण पाणी यांचे नियोजन शिवरायांनी व्यवस्थित केले होते म्हणूनच ते मॅनेजमेंट गुरू होते त्यामुळेच त्यांची रयतेचा राजा म्हणून ओळख आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत टकले यांनी केले
याप्रसंगी पत्रकार राम साळुंके, भाजपाचे ज्येष्ठ नेते आसराजी टकले,हतराळ सरपंच भिमराव टकले,सैदापुर सरपंच आदिनाथ डोंगरे, ग्रामसेविका श्रीमती अनिता गोसावी मॅडम,बबनराव केदार, माजी सरपंच बाळासाहेळ केदार ,नारायण टकले ,पिंटु केदार, सुभाष केदार ,श्रीकांत टकले,संभाजी गणेशकर,बाळासाहेब काकडे,मोहन टकले,बाबासाहेब क्षिरसागर,सुनिल आठरे,विकास शिवणकर ,बाबा टकले,अकुश टकले,बाळु गणेशकर आदि सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, उपस्थितांचे आभार शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष परमेश्वर टकले यांनी मानले.
Tags :

