बबनराव ढाकणे प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण
पाथर्डी- प्रतिनिधी
एकलव्य शिक्षण संस्थेचे शहरातील बबनराव ढाकणे साहेब प्राथमिक शाळेचे दि. २८ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एम. एम. नि-हाळी विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक सुखदेव तुपे, अफरोज पठाण, संजय उरशिळे. आशा गोला, आसमा शेख, गणेश सरोदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलाने सुरुवात झाली.याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीतांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी पानगे यांनी वर्षभराचा लेखाजोखा प्रास्ताविकेतून प्रकट केला. सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाचे निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,रंगभरण स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, संगीत स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले होते. विद्यार्थी आपले दैवत असून केंद्रबिंदू ठेवूनच आपण त्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे.शिक्षणाशिवाय माणूस ताठ मानेने जगू शकत नाही, म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी होईल तेवढे जमेल तसे दर्जेदार शिक्षण घ्यावे असे मत यावेळी प्राचार्य संजय घिगे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक जनार्दन बोडखे यांनी केले तर शेवटी आभार सारिका गोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मोनिका भंडारी , संदीप खेडकर आदींनी परिश्रम घेतले