महाराष्ट्र
80383
10
श्रीमती लता शितोळे-देशमुख सेवानिवृत्त
By Admin
श्रीमती लता शितोळे-देशमुख सेवानिवृत्त
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान संचलित- शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय तिसगाव, तालुका: पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर येथील माध्यमिक विद्यालयातील सामाजिक शास्त्र विषयाच्या सहशिक्षिका श्रीमती शितोळे लता शिवाजीराव उर्फ सौभाग्यवती लता सुभाष देशमुख (कासार पिंपळगाव) नियत वयोमानानुसार ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या सेवेचा शुभारंभ शैक्षणिक वर्ष
१९९३-९४ पासून आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान संचलित- न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर येथील माध्यमिक विद्यालयात सहशिक्षिका म्हणून शैक्षणिक वर्ष २००८- ०९ अखेर काम पाहिले.
त्यानंतर तिसगाव येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय तिसगाव येथे कार्यरत आहेत.
सेवा कालखंडात त्यांनी स्काऊट गाईड,निबंध स्पर्धा,रांगोळी व मेहंदी स्पर्धा, आरोग्य व परिपाठ समिती प्रमुख ,अभंग गायन स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, पालक व शिक्षक तसेच माजी विद्यार्थी मेळाव्यांचे आयोजन, शैक्षणिक सहलींचे आयोजन, रक्तदान शिबिरे, पालक व शिक्षक संघ, शालेय व्यवस्थापन, माध्यानह-भोजन समिती ,निकाल समिती, संगणक परीक्षा, परिवहन समिती, सांस्कृतिक उपक्रम, परिसर स्वच्छता समित्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला .विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये सहभाग, मॉडरेटर व परीक्षक म्हणून काम पाहिले (एसएससी बोर्ड पुणे अंतर्गत). प्रकल्प व अहवाल लेखन केले .राज्य आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन लेखांचे प्रकाशन करणे यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. आजपर्यंत त्यांना एकूण ३ राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सेवा कालखंडात त्यांनी १७ समित्यांचे सदस्यत्व स्वीकारले व त्या अनुषंगाने येणारे कामकाज यशस्वीपणे पार पाडले.
त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सलग ३१ वर्षे योगदान दिले. या कालखंडात त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक यशस्वी इंजिनीयर, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेतील अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे सेवेत कार्यरत आहेत.
त्यांच्या सेवाकालीन कार्याचे कौतुक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब राजळे, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम नागरिक मा. मोनिकाताई राजळे, माननीय राहुल दादा राजळे जिल्हा परिषद सदस्य कोरडगाव गट, माननीय श्री शिवाजीराव राजळे (अध्यक्ष दादा पाटील राजळे महाविद्यालय विकास समिती), मा. श्री उद्धवराव वाघ, मा. श्री रामदास यशवंत म्हस्के सर, मा. श्री सुभाषराव बुधवंत, माननीय श्री भास्करराव गोरे सचिव आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान, पत्रकारांनी तसेच श्री आठरे भाऊसाहेब विश्वनाथ मुख्याध्यापक शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय तिसगाव, श्री संदीप रामदास म्हस्के ,श्री जाधव पोपट, श्री लक्ष्मण देशमुख, श्री आसाराम भगत, श्री शहाणे सर, श्रीमती कराळे मॅडम, श्रीमती रंगारी मॅडम, श्रीमती लवांडे मॅडम,श्री बाळासाहेब ताठे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल, श्री वाघमारे शिवाजी मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पाथर्डी, माननीय प्राचार्य श्री दादा मरकड श्री हरीहरेश्वर महाविद्यालय कोरडगाव, माननीय प्राचार्य डॉ. राजधर टेमकर दादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगर, शिक्षण संस्थेतील कृषी विकास प्रतिष्ठान सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
Tags :

