पाथर्डी- लांडग्याचा शेतकर्यावर हल्ला, उपचारासाठी नगर रुग्णालयात दाखल
लांडग्याचा जबडा 15 मिनिटे दाबला
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
लांडग्याच्या हल्ल्यात पाथर्डी तालुक्यातील शेकटे येथील तरूण शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. मल्हारी रंगनाथ घुले (वय 31, रा. शेकटे), असे जखमी शेतकर्याचे नाव आहे.
शनिवारी (दि.24) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. सुमारे वीस मिनिटे लांडगा व घुले यांच्यात झटपट सुरू होती. मल्हारी घुले गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर डोंगर परिसराच्या बाजूला असल्याने त्यांच्या शेतात काम करताना, त्यांच्या शेतातील जनावरांवर दोन लांडग्यांनी हल्ला केला. तेव्हा घुले यांनी लांडग्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका लांडग्याने मल्हारी घुले यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात घुले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या गालावर व हातावर लांडग्याने लोचके ओढले आहेत. हल्ला झाल्यावर घुले यांनी आरडाओरडा केला; त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या शेतापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या विष्णू बन्सी घुले धावत आले. त्यांनी मल्हारी घुले यांच्या मदत करत लांडग्याला काठीने मारून त्यांची सुटका केली.
मल्हारी घुले यांच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारा केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले. विष्णू घुले, माजी नगरसेवक मच्छिंद्र पवार, बाळासाहेब घुले, संदीप पवार आदींनी जखमी घुलेंना उपचारासाठी मदत केली.
लांडग्याचा जबडा 15 मिनिटे दाबला
सुमारे वीस मिनिटे लांडगा व घुले यांच्यात झटपट सुरू होती. लांडग्याने घुले यांच्यावर हल्ला केल्यानंतर 15 मिनिटात घुलेंनी लांडग्याचा जबडा दाबून धरला, त्यांनी जबडा दाबून धरला नसता, तर लांडग्याने घुलेंवर मोठा हल्ला केला असता, या हल्यात त्यांना काहीही झाले असते; परंतु त्यांनी मोठ्या हिमतीने या लाडग्याचा सामना केला.