स्फोट- खेळणे समजून घरी आणलेल्या जिलेटीनचा स्फोट ; १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील निंभेरे या गावात खेळणी म्हणून आणलेल्या जिलेटीन कांडीचा स्फ़ोट होऊन तेरा वर्ष वयाचा मुलगा गांभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यश अंबरनाथ नागरे हा १३ वर्षीय मुलगा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या चालू असलेल्या कामाजवळ खेळत असतांना त्याला पांढऱ्या रंगाच्या २ कांड्या सापडल्या
राहुरी : राहुरी तालुक्यातील निंभेरे या गावात खेळणी म्हणून आणलेल्या जिलेटीन कांडीचा स्फ़ोट होऊन तेरा वर्ष वयाचा मुलगा गांभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यश अंबरनाथ नागरे हा १३ वर्षीय मुलगा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या चालू असलेल्या कामाजवळ खेळत असतांना त्याला पांढऱ्या रंगाच्या २ कांड्या सापडल्या, यशने १ कांडी तिथेच टाकून १ कांडी घरी घेऊन आला.त्याच्यासोबत खेळत असतानाच जिलेटीनचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला.यानंतर तात्काळ नातेवाईकांनी यशला रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याचेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यशच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.सध्या मृत्यूचा धोका जरी टाळला असला तरी तो पूर्ण बरा होऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचराकरिता आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च झाले असून अजून एक ते दीड लाख रुपये खर्च होणार असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डोक डॉक्टरानी दिली.
दरम्यान निळवंडेच्या उजव्या कालव्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप येथील ग्रामस्थानी केला आहे.बंदी असतानाही जिलेटीन तिथे पोहोचले कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरात अजूनही जिलेटीनच्या कांड्या पाहायला मिळत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून बंदी असताना जिलेटीनं कांड्याचा वापर करणाऱ्या ठेकेदारवार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.