सिमेंट खरेदीमध्ये वेबसाईटच्या माध्यमातून ६ लाख ६२ हजारांची फसवणुक
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
स्वस्तात सिमेंट देण्याचे आमिश दाखवून अहमदनगर शहरातील ॲड.हरीश भांबरे यांची काही दिवसांपूर्वी अंबुजा सिमेंट नावाच्या एक वेबसाईट द्वारे ६ लाख ६२ हजार ५०० फसवणूक झाली होती.सदर फसवणुकीमध्ये ॲड.भांबरे यांनी ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते ते खाते इंडसइंड बँकेचे होते.या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना जी माहिती भरली होती.त्यातील खात्याचे नाव,आयएफएससी कोड,खात्याचा प्रकार,खाते असलेली शाखा वेगवेगळ्या असताना ज्या शाखेमध्ये पैसे पाठवायचे होते.त्या शाखेत पैसे न जाता इंडसइंड बँकेच्या दुसऱ्या शाखेत पैसे ट्रान्सफर झाले.
यासंदर्भात ॲड.भांबरे यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल केला होता. परंतु इंडसइंड बँकेच्या ज्या शाखेत दिलेल्या आयएफसी कोड नुसार पैसे पाठवले होते त्या शाखेचे संबंधित खाते नव्हते.त्याच वेळेस इंडसइंड बँकेने संबंधित शाखेचे अकाउंट नसतानाही दुसऱ्या शाखेच्या अकाउंट वर पैसे पाठवले.शाखा वेगवेगळ्या असल्याने ज्या शाखेत पैसे पाठवले तेथील खाते नसल्याने इंडसइंड बँकेने पैसे पाठवले नसते तर फसवणूक झाली नसती.इंडसइंड बँकेच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक लोकांच्या फसवणूक होत आहे.या संदर्भात योग्य तो न्याय मिळावा म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या कडे तक्रार केली होती.परंतु रिझर्व बँकेने कुठलेही तक्रार न ऐकताच निर्णय एकतर्फी इंडसइंड बँकेच्या बाजूने देण्यात आला. त्यामुळे ॲड.हरीश भांबरे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट पिटीशन दाखल करून इंडसइंड बँकेच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर दाद मागितली.यावर उच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकून इंडसइंड बँक,भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडिया व इतरांना पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी म्हणणे दाखल करण्यास सांगितले आहे.