मिरी येथील बिरोबाभक्ताने सांगितली आगामी वर्षातील भविष्यवाणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मिरी येथील बिरोबा भक्ताने (सिताराम बाळाजी भगत) यांनी भंडाऱ्याची उधळण करत स्वतः च्या अंगावर तलवारीचे छत्तीस वार झेलत आगामी वर्षाची भविष्यवाणी सांगितली.
सविस्तर भविष्यवाणी अशी कि, दिवाळीचा दिवा साजरा होईल म्हणजे दिवाळीला पाऊस येईल. गोंदण भरण, लक्ष्मीला पिडा होईल, म्हणजे शेळ्या, मेंढ्या आजाराने मरतील. कैक हसतेस, कैक रडतेन, सटीच सटवण, कुठे कुठे चळण फिरण म्हणजे चंपाषष्ठीला काही ठरावीक ठिकाणीच पाऊस पडेल. बांदाशेजारी बांद, कैक हसतेन, कैक रडतेन म्हणजे काही शेतकऱ्यांचे पिके जातील. दुग्धर येतील झोकारे खातील, पांढऱ्याचं सोन होईल, म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू महाग होतील. कापसाला जास्त प्रमाणात भाव मिळेल. गहु, हरबरे जोडीन पिकतीन सवाईने विकतील. गहु ,हरबरा पिकाला झडती राहिल आणि जास्त दराने विकतील. वारा, वादळ,विजांचा कडकडाट होईल. खरीप हंगामातील बाजरी सह सर्व पिके येतील ढगफुटी होईल महापुर येईल. आषाढ महिन्यात पाऊस पडणार नाही. सत्तेसाठी राजकीय नेते एकमेकांना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न करतील.
मिरी ता. पाथर्डी येथील बिरोबा सेवक आसाराम भगत, जबाजी निर्मळ, भानुदास भगत, आबू भगत, दत्तात्रय भगत, भाऊसाहेब तोगे, विश्वनाथ तोगे, दशरथ भगत, अशोक शिपनकर यांनी विशेष सहकार्य केले. शिर्डी चे प्रसिद्ध उद्योजक रतीलाल लोढा काका यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.