अहमदनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान ;१४ मतदान केंद्रांवर होणार मतदान
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. 20) मतदान होत आहे.
या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ,आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार चंद्रशेखर घुले या सह अनेक दिग्गज या निवडणुकीत लक्ष घातले आहे.
सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार आहे तरी हे मतदान अधिकारी शुक्रवारीच केंद्रांवर दाखल होणार आहेत.
या आधीच जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, नगर तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन मतदान केंद्र आहेत.
बिगर शेती पूरकसाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या मतदान केंद्रांवर बिगर शेती मतदारसंघातील मतदारांना मतदान करता येणार आहे.
.
या ठिकाणी होणार विविध कार्यकारी सोसायटीसाठी मतदान केंद्र..
अकोले- जिल्हा परिषद शाळा
जामखेड- जिल्हा परिषद शाळा
कर्जत- जिल्हा परिषद शाळा
कोपरगाव- नगरपालिका शाळा
नगर- राष्ट्रीय पाठशाळा
नेवासा- जिल्हा परिषद शाळा नेवासा, खुर्द
पारनेर- न्यू इंग्लिश स्कूल
पाथर्डी- जिल्हा परिषद शाळा
राहाता- जिल्हा परिषद शाळा
राहुरी- लालाशेठ बिहाणी प्रशाला
संगमनेर- भिकाजी तुकाराम मेहर विद्यालय
शेवगाव- आदर्श विद्यामंदिर शाळा
श्रीगोंदा- जिल्हा परिषद शाळा
श्रीरामपूर- दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा
मतदार
विविध कार्यकारी सोसायटी मतदार
कर्जत- ७४, नगर-१०९, पारनेर-१०५
..
बिगर शेती मतदारसंघातील मतदार
अकोले- ५८, जामखेड-४८, कर्जत- ६४, कोपरगाव-१६६, नगर-२२२, नेवासा-८५, पारनेर-७९, पाथर्डी- २९, राहाता-१३९, राहुरी-१०२, संगमनेर-२३१, शेवगाव-२२, श्रीगोंदा-६९, श्रीरामपूर-६२.