मजुरी करणाऱ्या व्यक्तीला व्याजाच्या पैशांसाठी अपहरण करुन डांबून ठेवले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
समजलेली माहिती अशी : फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की 'आम्ही मजुरी करून जीवन जगतो. सुमारे सहा महिन्यांपूर्वी खासगी सावकार सुंदर काळे (रा.जामखेड) यांचेकडून १ लाख ३० हजार रूपये २० टक्के व्याजदराने घेतले होते.
आजपर्यंत ६० हजार रूपये दिले आहेत. एक महिन्यापूर्वी सुंदर काळे व त्याची पत्नी आमच्या राहते घरात घुसून आम्हाला घरातून बळजबरीने बाहेर काढून रिक्षामध्ये घेवून गेले. त्यानंतर एका खोलीत डांबून ठेवत बळजबरीने आम्हा पती पत्नीकडून आमच्या मालकीच्या जमीनीचे बळजबरीने नोटरी करून घेतली.
यानंतरही आठ दिवसांनी व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी सावकार पती-पत्नीने आमच्या घरी येऊन मला व माझे पतीला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सावकारकीच्या अनेक अमानुष घटनासमोर येताना दिसतात. काही घटना ताजा असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी अपहरण करुन डांबून ठेऊन जमीन लिहून घेणे तसेच घरात घुसून जबर मारहाण करण्याचा प्रकार जामखेडमध्ये समोर आला आहे .
याप्रकरणी सावकार पती-पत्नी विरोधात अपहण, सावकारी, मारहाणीचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.