महाराष्ट्र
अवैध दारुप्रकरणी वर्षात 69 जणांवर कारवाई; चौदा जणांची हद्दपारी
By Admin
अवैध दारुप्रकरणी वर्षात 69 जणांवर कारवाई; चौदा जणांची हद्दपारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले शहरासह परिसरात अवैद्य दारू विकणार्या वर्षभरात तब्बल 69 जणांविरुद्ध कारवाई करीत लाखो रुपयांचा दारुसाठा हस्तगत करून, अकोले पोलिसांनी 14 जणांवर हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केला.
मात्र, संगमनेर दारू उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विक्रीवर बोटावर मोजण्या इतक्याच कारवाया असल्याने अधिकार्यांच्या कर्तबगारीविषयी उलट-सुलट बोलले जात आहे.
आदिवासी तालुका म्हणून अकोल्याची जिल्हाभरात ओळख आहे. पर्यटन, धार्मिक, तीर्थस्थळे, संस्कार व संस्कृतीचा मानबिंदू आणि अलीकडच्या काळात पर्यटनाचा नवा ट्रेन विकसित झाला आहे. परिणामी हॉटेल व्यवसाय चांगलीच उभारी घेऊ पहात आहेत. अकोले शहरासह परिसरात अवैध दारुविकेत्यांकडून दारु उत्पादन शुल्कच्या 'अर्थपूर्ण' संबंधामुळे अवैध दारुची सर्रास विक्री होताना दिसत आहे.
शाहूनगर, कारखाना रोड, इंदोरी फाटा परिसरात अकोले पोलिसांनी वर्षभरात तब्बल 69 अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करून, मोठ्या प्रमाणात अवैध दारू हस्तगत केली, परंतु अनेकदा अकोले पोलिसांनी कारवाई करूनही उत्पादन शुल्कच्या पाठबळामुळे पोलिस निघून जाताच काही तासातच अवैध दारुविक्रेते पुन्हा जामाने दारुविक्री करीत असल्याचे चित्र अकोल्यात पहावयास मिळत आहे. संगनमेर दारू उत्पादन शुल्कच्या डावपेचामुळे अकोले पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
ड्राय डे' च्या दिवशी म. फुले चौक, नवलेवाडी फाटा, इंदोरी फाटा परिसरात अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे अवैध दारू व्यावसायिकांवर उत्पादन शुल्क किती मेहेरबान आहे, याचा प्रत्यय येतो. अवैध दारुविक्रीमुळे शासनाचा महसूल बुडतो.
अवैध दारुमुळे विधवा झालेल्या महिलांचे आज 15 ऑगस्टपासून अकोल्यात उपोषण सुरू होत आहे. शाहूनगरमधील अवैध दारुमुळे आतापर्यंत 23 मृत्यू झाले. अनेकदा तक्रारी करूनही 400 कुटुंबीयांच्या या छोट्या वस्तीत अजूनही 7 ठिकाणी अवैध दारू विकली जाते. अनेक तरुण त्यामुळे मृत्यूच्या दारात आहेत.ज्या देशी दारू दुकानांतून शाहूनगरमध्ये दारू येते, त्यांचे परवाना रद्द करावे. दारु विक्रीची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकार्यांवर निश्चित करून कारवाई करावी.
-हेरंब कुलकर्णी (दारुबंदी चळवळ, सदस्य, अकोले.)
अकोल्यामध्ये या वर्षात दारुबंदी कायद्याप्रमाणे अवैधरित्या दारू विकण्यार्या 69 जनांवर कारवाई झाली. 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. वारंवार अवैध दारुविक्रीचे गुन्हे करणार्या 14 आरोपींविरुद्ध दारुबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव संगमनेर उपविभागीय अधिकार्यांकडे पाठविण्यात आले. अवैध दारुविक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
– मिथून घुगे (स. पो. निरीक्षक, अकोले.)
Tags :
452
10