विघ्नहर्ता अर्बन" पतसंस्थाचे पाडळी येथे उद्घाटन कार्यक्रम संपन्न
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख व आ.मोनिका राजळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांंनी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी बदलते हवामान तसेच हवामानात होणारे बदल या विषयी शेतकऱ्यांना माहीती दिली.यावेळी शेतकऱ्यांनी त्याच्यासोबत हवामान,ऊन,वारा,पाऊस या विषयावर चर्चा केली.
तसेच
यावेळी
राजेंद्र फटांगरे, संस्थापक अध्यक्ष रंगनाथ कचरे, भीमराज काकडे, महादेव आघाव, शरद कचरे यांनी नव्याने सुरू केलेल्या "विघ्नहर्ता अर्बन" पतसंस्थाचे उद्घाटन यावेळी त्यांनी केले.यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी सभापती काकासाहेब शिंदे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर,युवा नेते गोकुळ दौड,स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डाॕ.कृषिराज टकले,चंद्रकांत महाराज लबडे, भाऊसाहेब कचरे सर, शेषराव कचरे, सरपंच सुरेखाताई गर्जे, सुमनताई कचरे, नरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, बाजीराव गर्जे, दिलीप कचरे, भाऊसाहेब तांदळे, चंद्रकांत लबडे महाराज, अनंत ढोले, भिसे महाराज, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.