चितळी गावात विविध विकास कामाचे भूमीपूजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथे विविध विकास कामाचे भूमीपुजन सरपंच अशोक दादा आमटे यांच्या हस्ते करण्यात आले.गावातील मुळापाटचारी ते पवार वस्ती रस्ता,
गावातील शहापूर गल्ली बंदिस्त गटार करणे,साळवे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे,गावांतर्गत पाण्याची टाकी बांधणे,गावांतर्गत पूल तयार करणे.अशा इतर विविध कामाचे भूमीपुजन करण्यात आले.
गावातील रस्ते,पाणी,वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून गावाचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे.गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असुन ग्राम पंचायत माध्यमातून कामे करत आहे.गावातील शैक्षणिक ,सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने सुरु आहे.गावातील तरुण मिञ तसेच ग्राम पंचायत सदस्य अनमोल सहकार्य करुन साथ देत आहे.समाजकार्य करण्याची आवड आहे.गावातील वाचनालय दुरुस्ती करण्यात येणार आहे.तसेच शेतकऱ्यांना पिकासंबधी मार्गदर्शन शिबीर तसेच पशु पालक दूध उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करत आहे.गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून प्रयत्न करत आहे.गावातील विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी शाळांना विशेष प्रकारचे सहकार्य करणार आहे.असे यावेळी सरपंच अशोक आमटे यांनी सांगितले.यावेळी ग्रामसेवक रामनाथ तळेकर,
उपसरपंच संतोष कदम,बाबा आमटे,अशोक कुटे,अशोक ढमाळ,आदिनाथ आमटे,अनिल ढमाळ,दादापाटील साळवे,अजितदादा ताठे,बाळासाहेब ताठे ,अमोल कोठुळे,
संजय पवार,
डाॕ.नितीन ढमाळ,डाॕ.कुटे,नितीन कदम,सर्जैराव साळवे,अरुण कोठुळे,अक्षय ढमाळ,रवि ताठे,भिवाजी भिसे,साईनाथ ढमाळ,अर्जुन आमटे,एस.आर.कन्ट्क्ंशन पदाधिकारी,
ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित होते.