पाथर्डी- पाणबुडी मोटारींची चोरी करणारा मुद्देमालासह जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विहिरींतील पाणबुडी विद्युत मोटारींची चोरी करणार्या टोळीचा पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश करत एका आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी बाळकृष्ण शिवाजी भराट (वय 40, रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) यांनी दि. 9 ऑगस्ट रोजी चोरीची फिर्याद दिली होती. त्यांच्या शेतातील तीस हजार रुपये किंमतीची पाणबुडी मोटार, तसेच शेजारी शेती असलेल्या रुख्मिणी राजेंद्र भराट यांच्या शेतातील पस्तीस हजारांची पाणबुडी मोटार चोरीस गेली होती.
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना हा गुन्हा गणेश नारायण पडळकर (रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) याने केला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिस नाईक अनिल बडे, पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख, अतुल शेळके, संजय बडे यांनी माहिती काढून संशयित आरोपी पडळकर याला तोंडोळी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा साथीदार पांडुरंग विष्णू काकडे, राजेंद्र पालवे (दोघे रा. तोंडोळी, ता. पाथर्डी) यांच्यासह केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील मोटारी त्याच्या राहत्या घरात ठेवल्याची कबुली देत गुन्ह्यातील मोटारी काढून दिल्या.