महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातील तरुणाचा मोबाईल हिसकाविला; चोरटे गजाआड; जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील घटना
By Admin
पाथर्डी तालुक्यातील तरुणाचा मोबाईल हिसकाविला; चोरटे गजाआड; जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पीएमपी थांब्यावर तरुणाचा मोबाईल हिसकावून पळून चाललेल्या चोरट्यांना पोलिसांनी नागरिकांचे मदतीने पाठलाग करून पकडले.
मधू व्यंकय्या (वय 55), पी. प्रेमकुमार ब्रह्मेय्या (वय 23), पी. धनराज कन्हैया (वय 29, तिघे मूळ रा. ग्रीन पार्क, हैदराबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रतीक खेडकर (वय 19, रा. वडगाव बुद्रुक) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पीएमपी थांब्यावर थांबला होता. त्या वेळी व्यंकय्या, ब्रह्मेय्या, कन्हैया यांनी खेडकरच्या हातातील 15 हजारांचा मोबाईल हिसकाविला आणि तिघे मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या दिशेने पळाले. खेडकरने आरडाओरडा केला. त्यावेळी पोलिस आणि नागरिकांनी पकडले. पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करीत आहेत. चोरट्यांनी मोबाईल हिसकाविण्याचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिस तपास
करीत आहेत.
एसटी स्थानकात मोबाईल पळविला
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत आरिफ सय्यद (वय 38, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद कुटुंबीय स्वारगेट एसटी स्थानकात थांबले होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी सय्यद यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. पोलिस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.
पाच मोबाईलसह आठ वाहने जप्त
शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणार्या हैद्राबादी टोळीतील तिघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे महागडे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल पवार यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. कर्मचारी मोहन काळे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, अमोल सरडे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पाटील इस्टेट भागातून रिक्षा जप्त
बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने बंडगार्डन, भारती विद्यापीठ, हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहे. संबंधित रिक्षा पाटील इस्टेट भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार सापळा लावून रिक्षा चोरणारा आनंद माने (23, वाकड) यास अटक करून त्याच्याकडून चार वाहने जप्त केली. तर, दिनेश डोंगरे (32, रा. केशवनगर) याला अटक केली.
Tags :
719
10