लेडी सिंघम; पोलीस अधीक्षक सातपुते यांची 'तेजस्वी' कामगिरी
By Admin
लेडी सिंघम; पोलीस अधीक्षक सातपुते यांची 'तेजस्वी' कामगिरी
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील पहीली महिला आयपीएस अधिकारी
कासार पिंपळगाव-
जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा 2012 साली 198 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तेजस्वी सातपुते यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात आपली एक वेगळीच धमक निर्माण केली आहे.
बंजारा समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी ऑपरेशन परिवर्तन आणले आणि याची देशभर चर्चा झाली. तेजस्वी सातपुतेंच्या ऑपरेशन परिवर्तनमुळे सोलापूरचे नाव देशपातळीवर झळकले.
यांनी सोलापूरच्या ग्रामीण भागात आपली एक वेगळीच धमक निर्माण केली आहे. बंजारा समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी ऑपरेशन परिवर्तन आणले आणि याची देशभर चर्चा झाली. तेजस्वी सातपुतेंच्या ऑपरेशन परिवर्तनमुळे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतुन थेट आयपीएस पदी निवड झालेल्या तेजस्वी सातपुते यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मी एक महिला आहे म्हणून वावरत नाही. महिला असो किंवा पुरुष सर्वांना समान काम करावे लागते. यूपीएससी परीक्षा देताना देखील महिला आहे म्हणून स्वतः ला कधी कमी लेखल नाही. किंवा महिला आहे म्हणून कमी अभ्यास केला असं काही नाही. जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा 2012 साली 198व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि आयपीएस पदी निवड झाली.
लेडी सिंगम; पोलीस अधीक्षक सातपुते यांची सोलापूरात तेजस्वी कामगिरी
गावातील मी पहिलीच महिला आयपीएस साकेगाव(पाथर्डी) हे छोटंसं गाव.अहमदनगर नगर आणि पाथर्डी याच्या बॉण्डरी वर असलेल्या शेवगाव येथे तेजस्वी सातपुते यांचा जन्म झाला होता. तेजस्वी सातपुते यांच्या आई प्राथमिक शिक्षिका होत्या. आई मुळेच शिस्त लागली. आपल्या मुलीने सतत अभ्यास करून मोठं व्हावं असं आईला नेहमी वाटत होतं. आणि आईने पाहिलेल्या स्वप्नाचा खरं केलं 2012 साली.दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस झाले. त्यावेळी माझ्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनास झाला होता. कारण मी माझ्या गावातील पहिलीच महिला आयपीएस अधिकारी झाली होते.
यूपीएससीचा अभ्यास करताना कष्ट घेतले - सुरुवातीला पायलट होण्याचं स्वप्न पाहिला होता. नंतर बीएससी बायो टेक्नॉलॉजी मध्ये केले.शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पहिला आणि नंतर एलएलबीला ऍडमिशन घेतल. एलएलबीचे शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचं निश्चय केला. मुंबई येथील एसआयएसी (प्रि आयएएस कोचिंग सेंटर-मुंबई) येथे प्रवेश मिळवला आणि जीव तोडून अभ्यास केला. यूपीएससीचा अभ्यास सुरू असताना दिवाळी सण आले, पण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तोंडावर आली होती, त्यामुळे दिवाळी सणाला घरी न जाता मुंबई येथे राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. रात्रदिवस जीव तोडून अभ्यास केला आणि 2012 सालच्या निकालात 198वी रँक घेऊन उत्तीर्ण झाले. 198व्या रँकला आयपीएस मिळाले आणि त्यात देखील महाराष्ट्र कॅडर मिळाले.
गुन्हेगारी जगतातील महिलांसाठी ऑपरेशन
सोलापूरच्या ग्रामीण भागातील लमाण तांडे किंवा बंजारा समाजाच्या महिलांबाबत अभ्यास केला. या महिला हातभट्टी दारूचा व्यवसाय करत होत्या. पोलीस नेहमीच या ठिकाणी कारवाई करून जातात आणि हातभट्टी दारूच्या भट्ट्या बंद करतात. काही काळानंतर या महिला हातभट्टीवर पून्हा काम करताना दिसतात. त्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारू व्यवसायात असलेल्या महिलांना ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना गारमेंट क्षेत्रात आणले आणि बंजारा समाजातील हातभट्टीवर काम करणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. ऑपरेशन परिवर्तनची देशपातळीवर दखल घेऊन पुरस्कार देखील देण्यात आला.सोलापूरचे नाव देशपातळीवर आणण्याचा महत्वपूर्ण कार्य पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.