महाराष्ट्र
280
10
क्रिडा स्पर्धा मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो- अभय आव्हाड
By Admin
क्रिडा स्पर्धा मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो- अभय आव्हाड
पाथर्डी- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रम पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्या मंदिर व बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
कोरोना सारख्या महामारीनंतर दोन वर्षानी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने घेण्यात येत आहेत. यामुळे शाळेच्या क्रीडांगणावरील खेळाडूंचा उत्साह प्रचंड दिसून येत होता.तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची सुरुवात कबड्डी या क्रीडा प्रकाराने झाली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातील २६ संघ, १७ वर्षे वयोगटातील २४ संघ व १९ वर्षे वयोगटातील सहा संघांनी सहभाग घेतला. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळ व तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक तसेच पदोन्नती क्रीडाशिक्षक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उद्घाटन समारंभ कार्यक्रमात बोलतांना पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की, शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे गुण आत्मसात होतात. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक स्तर वाढीस लागतो. सर्व खेळाडूंनी सांघिक भावनांनी खेळ करून आत्मविश्वास कायम ठेवावा. सामन्यादरम्यान खिलाडू वृत्ती जोपासावी. असे आवाहान करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अॅड. सुरेशराव आव्हाड , पाथर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल गुगळे, शंकरराव रासने ,माजी नगराध्यक्ष नंदकुमार शेळके, जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे,सामाजिक कार्यकर्ते बबनराव सबलस, किशोर परदेशी, तालुका क्रीडा समिती अध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे, प्रा. रमेश मोरगावकर ,पत्रकार उमेश मोरगावकर, राजेंद्र सावंत, अमोल कांकरिया, बाळासाहेब खेडकर, जगन्नाथ खेडकर, विक्रम नेहुल, नामदेव जठार,चंद्रकांत आंधळे, अजय भंडारी व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन उत्कृष्ठ पद्धतीचे केल्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी कौतुक व अभिनंदन केले. यासारखे नियोजन मिनी ओलंपिक सारख्या स्पर्धेत केले जाते, असे म्हटले . यावेळी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक व खेळाडूंना अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार व नाश्ता देण्यात आले.तालुक्यातील सर्व खेळाडूंचे व शिक्षकांचे स्वागत पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी.ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे व पर्यवेक्षक संपत घारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक ज्ञानेश्वर गायके यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र शिरसाट तर आभार प्रा. रमेश मोरगावकर यांनी मानले. स्पर्धा पार पाडण्यासाठी रावसाहेब मोरकर, सचिन शिरसाठ,प्रमोद हंडाळ, अजय शिरसाट, अविनाश घुगे,एकनाथ पालवे, सतीश डोळे, प्रा. विजय देशमुख यांनी परिश्रम घेतले.
Tags :

