महाराष्ट्र
Breaking-शेणातून १ लाख रुपये दरमहा कमावतेय MBA झालेली तरुणी, असं सुरू केलं स्वत:चं स्टार्टअप!
By Admin
Breaking-शेणातून १ लाख रुपये दरमहा कमावतेय MBA झालेली तरुणी, असं सुरू केलं स्वत:चं स्टार्टअप!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कवितानं मुंबईतून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागलं आणि ती तिच्या मूळ गावी परतली होती.
खुडाना या आपल्या गावी पोहोचल्यानंतर तिनं स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं. झुंझुनू येथील रिको औद्योगिक क्षेत्रात तिनं कम्पोस्ट प्लांट सुरू केला. प्लांट सुरू करुन केवळ १ वर्ष झालं आहे. प्लांटमध्ये कविता गायीच्या शेणापासून कम्पोस्ट खतं तयार करते. हे खत ती आठ रुपये किलोनं विकते. कवितानं दिलेल्या माहितीनुसार तिनं तिच्या प्लांटमध्ये दोन जणांना स्थायी स्वरुपाचा रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे. दरमहा ती जवळपास १ लाख रुपयांची कमाई करते.
लहानपणापासून स्वप्न होतं की मी बॉस असेल अशा ठिकाणी काम करावं. हे स्वप्न तिनं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर साकार देखील केलंय. तेही फक्त शेण विकून. झुंझुनूच्या खुडाना येथे राहणाऱ्या कविता जाखड ही शेण विकून दरमहा १ लाख रुपये कमावत आहे.
कविताचं इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. त्यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून प्रथम क्षेणीतून पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयातून एमबीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
"माझ्या मुलीनं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्याआधी याधी कधीच शेणाला हात देखील लावला नव्हता. पण ती आता स्वत: शेणखताचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायासह ती लोकांना रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे होणाऱ्या भयंकर परिणामांबाबत शेतकऱ्यांना जागरुक करण्याचंही काम करत असल्याचं तिनं मला सांगितलं. ती इतरांना काम देखील देत आहे. त्यामुळे मी तिला संपूर्ण सहकार्य करत आहे", असं कविताच्या आईनं म्हटलं. कविताचे वडील देखील खूप वर्ष नोकरी केली आता व्यवसायात मुलीला हातभार लावला पाहिजे असं म्हणाले.
गांडुळ विकण्याचाही व्यवसाय
निवृत्त सैनिक सुरेंद्र जाखड यांची मुलगी कवितानं अधिक माहिती देताना सांगितलं की तिच्या कमाईचे दोन मार्ग आहेत. शेणखत विकून तर कमाई होतेच. पण शेणखतासोबतच गांडुळ विकूनही कमाई केली जाते. तिची आई मनोज देवीही या कामात पूर्ण सहकार्य करते. शेणखतावर गांडुळे टाकल्यानंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांत कंपोस्ट खत तयार होते. ते मशीनद्वारे फिल्टर आणि पॅक केलं जातं. योग्य तापमान आणि ओलावा मिळाल्यास गांडुळे ९० दिवसांत दुप्पट होतात.
Tags :
960
10