प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकार्यांची चौकशी करा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकार्यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांची बदली करावी, या मागणीसाठी उपोषण करणार्या आंदोलकांशी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी चर्चा केली.
या विषयावर 7 जूनपर्यंत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आम्ही शुक्रवारी (ता. 10) उपोषण करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकार्याची कार्यपद्धती सदोष असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, तसेच कायमस्वरूपी अधिकार्यांची नियुक्ती करावी, ओपीडीची वेळ नियमित ठेवावी, अशा मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा 10 जूनपासून उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर, शाहनवाज शेख, सुंदर कांबळे यांनी दिला होता. या आंदोलनाला माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी पाठिंबा जाहीर केला. या सर्व आंदोलकांशी आज डॉ. सुवर्णमाला बांगर, डॉ. एन. एस. गायकवाड, डॉ. महारुद्र खडपारे यांनी चर्चा करत या विषयावर येत्या 7 जूनला निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.