गावात तलाठी म्हणून काम करणाऱ्याला एक हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले
By Admin
गावात तलाठी म्हणून काम करणाऱ्याला एक हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
हकीगत अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे तिखोल गावातील आजोबा व वडील यांचे नांवे असलेली शेतजमीन वारसा हक्काने तकारदार त्यांची आजी, आई, भाऊ यांचे नांवे करुन त्याचे नावाची नोंद लावणेकरिता अर्ज दिला होता.
सदरची नोंद लावणेकरिता आरोपी लोकसेविका लता एकनाथ निकाळजे, धंदा नोकरी, तलाठी, सजा लोणी हवेली, अतिरिक्त पदभार किन्ही, ता.पारनेर, जि.अहमदनगर यांनी तक्रारदार यांचेकडे २,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तकारदार यांनी आरोपी लोकसेविका यांना १००० रुपये दिले, तरीही उर्वरित १०००/- रुपयेची लाचेची मागणी करत असलेबाबतची तकार तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर, यांचेकडे दिली. दिलेल्या तक्रारीवरुन दि. २८/०६/२०२२ रोजी करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी लोकसेविका यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे १,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेने आज रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेविका यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून १,०००/- रुपये लाचेची रक्कम तलाठी कार्यालय किन्ही येथे स्वीकारली असता आरोपी लोकसेविका लता एकनाथ निकाळजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर सापळा कारवाई ही मा.श्री.सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.श्री.नारायण न्याहाळदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, व मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर कडील पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, चालक पोहेकॉ.हारुण शेख, पोना.रमेश चौधरी, पोना.विजय गंगुल, मपोना संध्या म्हस्के, पोकॉ.वैभव पांढरे व चालक पोना.राहुल डोळसे यांचे पथकाने केली आहे.
कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.