राष्ट्रवादीत वाद उफाळला ; राजकारण वेगळ्या वळणावर? स्वतः खा.शरद पवार लक्ष घालणार?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बहुतांशी आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. विशेषतः अकोले तालुक्यात जेथे ज्येष्ठ नेते पिचड साहेबांनी राष्ट्रवादी सोडली होती तेथे देखील जनतेने राष्ट्रवादीशी साथ देत डॉ.किरण लहामटे याना आमदार केले होते. दरम्यान आता याच राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळून येत आहे.
आमदार डॉ.किरण लहामटे यांनी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानाचा सोशल मीडियावर जाहीर निषेध राष्ट्रवादीचेच युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी केला. दरम्यान त्यांनी असे कृत्य केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी मालुंजकर यांची पक्षातून हकालपट्टी केली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत आता रवींद्र मालुंजकर काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याआधीही श्री .मालुंजकर यांच्याकडून असे कृत्ये घडली होती. श्री .मालुंजकर यांना अनेक वेळा या बाबत समज देण्यात आली होती.
अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभेच्या वेळी स्वतः या ठिकाणी लक्ष घातले होते. महाराष्ट्रात जवळचे साथीदार पवार साहेबांना सोडून जात असताना अहमदनगमध्ये मात्र राष्ट्रवादीशी जोरदार साथ मिळाली.
मात्र त्यांच्या वागण्यात कोणताही फरक पडला नसल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे कुमकर यांनी सांगितले. दरम्यान आता राष्ट्रवादीमध्ये असे अंतर्गत वाद होऊ लागले तर ते राष्ट्रवादीस अडचणीचे ठरू शकते.
त्यामुळे आता स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लक्ष घालून सर्वाना समज देतील का? अशी चर्चा सध्या अहमदनगरमध्ये सुरु आहे.