नोकरीच्या आमिष दाखवून महिलेला साडेसहा लाख रुपयांना लुटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवित दोघांंनी मिळून एका 34 वर्षीय महिलेला साडेसहा लाख रुपयांना गंडा घातला. दरम्यान, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना राहुरी तालुक्यात घडली.
याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील खडांबे परिसरात 34 वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2020 ते एप्रिल 2022 या दरम्यान दोन आरोपींनी संगनमत करून या महिलेला सरकारी नोकरी लावून देतो. तसेच, लग्नाचे आश्वासन देत तिच्याकडून साडेसहा लाख रूपये घेऊन फसवणूक केली.
यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी शकिल बागवान (रा. सोनई, ता. नेवासा) व आनंदकुमार शहा (रा. पुणे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोघेही पसार झाले. राहुरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.