महाराष्ट्र
पाथर्डी शहरात महावितरण' कर्मचारी उतरले चक्क रस्त्यावर! वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरू
By Admin
पाथर्डी शहरात महावितरण' कर्मचारी उतरले चक्क रस्त्यावर! वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरात वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरू असून, यामध्ये ग्राहकांना युनिटनुसार योग्य बिले जातात का, विजेचा वापर जास्त असून, बिले कमी जातात का?
मीटरमध्ये फेरफार अथवा मीटर खराब आहेत का? या सर्व गोष्टींची विशेष पथकामार्फत शहानिशा करून तपासणी करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे यांनी दिली.
पाथर्डी शहरांमधील शून्य ते 50 युनिट वीज वापरणार्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. वीज वापरणार्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की, रीडिंगप्रमाणे बिल मिळत नाही. वीज वापरणार्या ग्राहकांना रीडिंगनुसार योग्य पद्धतीने बिले देऊन, ती बिले वेळेत देण्यासाठी पूर्वीची एजन्सी बदलून नवीन एजन्सी या कामी नियुक्त केली. आता, यापुढे ग्राहकांचे मीटर रीडिंग व्यवस्थित घेऊन, त्या बिलांचे वितरण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अधिकार्यांचे बारीक लक्ष असणार आहे.
महावितरण वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे यांच्यासह उपकार्यकारी अभियंता सचिन माळी, सहायक अभियंता मयूर जाधव, दीपक मुसळे, गणेश वायखिंडे, सुहास अन्नदाते, रमेश गावित, अरुण दहिफळे, सोमनाथ शिरसाट, नवनाथ धायतडक, राजू म्हस्के, अभिषेक अन्नदाते, ऋषिकेश शिरसाट आदींच्या पथकाने पाथर्डी शहरातील आखर भाग, कोरडगाव चौक, मेन रोड, नगर रोड, अजंठा चौक, जय भवानी चौक व कसबा विभाग आदी परिसरातील वीज वितरण ग्राहकांच्या दुकानात व घरच्या वीज कनेक्शनची आणि मीटरची तपासणी केली.
कार्यकारी अभियंता काकडे म्हणाले, ग्राहकांना योग्य प्रकारे बिल आणि युनिट प्रमाणे बिल जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष मोहीम आखली आहे. विजेवर चालणारी चांगल्या दर्जाची उपकरणे वापरून अनावश्यक विजेचा वापर बंद करावा. त्यामुळे आपल्याला कमी विजेचे युनिट येऊन त्याप्रमाणे बिल येईल, ही कारवाई सुरूच राहणार असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील वीज ग्राहकांची तपासणी करून योग्य बिल जाते का नाही व वीजचोरी होणार्या ग्राहकांचाही शोधून वीज गळती थांबविली जाणार आहे.
जे ग्राहक विजेचा चोरून वापर करत आहेत, अशा संशयास्पद ग्राहकांची प्रथम आम्ही तपासणी करत असून, ज्या ठिकाणी मीटर फॉल्टी आहे किंवा त्यामध्ये फेरफार आहे, असे मीटर त्वरित बदलून दिले जात आहेत.
वीज वितरणचे आवाहन
ज्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात विजेचा चोरून वापर होत आहे, अशा ठिकाणची माहिती वीजवितरण कंपनीच्या अधिकार्यांना कळवावी, माहिती देणार्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. वीज वितरणच्या अधिकार्यांनी आता पाथर्डी शहरात वाढत्या वीजगळतीवर उपाययोजना करण्यासाठी ही जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आहे.
वीज गळती थांबविण्यासाठी कंबर कसली
पाथर्डीत 50 टक्क्यांहून अधिक वीज गळतीचे प्रमाण आहे. वीज वितरण अधिकार्यांची चिंता वाढली आहे. वीज वितरण कंपनीच्या सर्व कर्मचार्यांना वाढत्या वीज गळतीला थांबवण्यासाठी चोरी करून वीज वापरणार्या ग्राहकांचा शोध घेण्यासाठी कामाला लावले. शहरात महिन्याला एकूण 11 लाख युनिटचा वापर केला जातो; मात्र त्यापैकी सुमारे पाच लाख 50 हजार युनिटची बिल वीज वितरण कंपनीला मिळते. मोठा आर्थिक फटका वीज वितरण कंपनीला सध्या बसत आहे. हे ओळखून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनीही आता लक्ष केंद्रित केले.
Tags :
7093
10