अहमदनगर जिल्ह्यात नोकरी करण्याची संधी, वेगवेगळ्या पदांसाठी होणार भरती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता तुम्ही खाली पाहू शकता.
अर्ज पाठवायची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२२ आहे. त्यामुळे सविस्तर माहितीसाठी अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत वेबसाईटला (Website) भेट द्या.
सदर भरतीतील जागा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर या पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.
अहमदनगर (Ahmednagar) मधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) विविध पदांसाठी भरती होणार असून उमेदवारांनी ही नोकरी (Job) मिळवायची असेल तर सविस्तर माहिती वाचून त्या पद्धतीने अर्ज करू शकता.
पदांचे नाव :
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
- प्राथमिक शिक्षक
- सहाय्यक ग्रंथपाल
- बायो लॅब अटेंडंट
- इलेक्ट्रिशियन
- सुतार
- प्लंबर
पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - 1) CBSE नियमांनुसार 2) पदवी आणि बी.एड
2) प्राथमिक शिक्षक - प्राथमिक शिक्षणात डिप्लोमा (डी.एड )
3) सहाय्यक ग्रंथपाल - बी.लायब्रेरी सायन्स/ पदवीधरसह ग्रंथालय विज्ञानमध्ये डिप्लोमा
4) बायो लॅब अटेंडंट - १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान
महत्त्वाची माहिती :
- अर्ज शुल्क - १००/- रुपये
- वेतन - नियमानुसार
- नोकरी ठिकाण - अहमदनगर
- अर्जाचा पत्ता - Principal,Army Public School Ahemadnagar, C/o. AC Center and School, Ahemadnagar - 414002
- इमेल आयडी - [email protected]
- अधिकृत वेबसाईट - www.apsahmednagar.com