देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान- कैलास दौंड
पाथर्डी -प्रतिनिधी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या स्वातंत्र्य मतदार संघाच्या मागणी विरोधात महात्मा गांधी हे पुणे येथे उपोषणास बसले होते. त्यामुळे समाज हिताची ती मागणी बाजुला ठेऊन डाॅ. बाबासाहेबांनी महात्मा गांधीचे उपोषण सोडवले व त्यांचा प्राण वाचवला हा इतिहास आहे. म्हणुन डाॅ. बाबासाहेब हे खरे या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत, भारतरत्न आहेत, हे सर्व भारतीयांनी लक्षात घ्यावे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठी मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जेष्ठ सहित्यिक व परिवर्तनवादी कवी डाॅ. कैलास दौंड यांनी केले. ते पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव येथे आयोजीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नितिन गर्जे होते. कैलास दौंड पुढे म्हणाले, मसुदा समीती मधील सात सदस्यां पैकी सहा सदस्य वेळवेगळ्या कारणाने सतत गैरहजर राहीले . पण महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अविरत परिश्रम घेऊन २ वर्ष ११ महीने आणी १७ दिवसात संविधान निर्मितीचे काम केले, म्हणुन ते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार आहेत.
या प्रसंगी श्रीपत बळीद, मा.नायब तहसीलदार जगदिश गाडे, संजय गांधी समितीचे सदस्य हाजी हुमायुन आतार, समाज प्रबोधनकार बंडुबाबा नाकाडे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महेद्र राजगुरू, स्वामी सर्मथ पतसंस्था पाथर्डीचे व्हाईस चेअरमन एकनाथ ठोकळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नितीन गर्जे यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या कार्यावर भाषणातुन विचार मांडले.या वेळी सरपंच नितीन गर्जे, पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा माजी सरपंच व विद्यमान सोसायटीचे संचालक बंडुशेठ पठाडे, संभाजी खेडकर, ग्रा.प.सदस्य बबनराव नाकाडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा ग्रा. प. सदस्य बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.