महाराष्ट्र
पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही म्हणून कट्टर मुकुंद गर्जै समर्थकाची विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By Admin
पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही म्हणून कट्टर मुकुंद गर्जै समर्थकाची विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते अशी भावना त्यांच्या समर्थकांत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले.
त्यावेळी उपस्थितांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडीस बाटली काढून घेण्यात आली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. ही स्टंटबाजी असावी की संतप्त प्रतिक्रिया, या विषयी आता तालुक्यात चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
औरंगाबादेत भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ दरम्यान, औरंगाबाद (Aurangbad) येथील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ (Munde supporters protest outside Aurangabad BJP office) घातला. पंकजा मुंडे यांचे समर्थक दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली
पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तसंच पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
गर्जे याना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Tags :
12473
10