Breaking- 'या' ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा,परंतु क्लब चालकाचे नाव गायब
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याबाबत अधिक माहिती अशी, तालुका पोलिसांनी पोलीस पथकासह सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल लगत असणार्या पत्याच्या क्लब वर टाकलेल्या धाडीत रोख रक्कम हस्तगत करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला.
कोपरगाव तालुक्यातील एका पत्त्याच्या क्लब वर तालुका पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात चौघांवर गुन्हा दाखल केला. मात्र आर्थिक तडजोड होवुन गुन्ह्याचे ठिकाण व क्लब चालकाचे नाव फिर्यादीतुन वगळल्याची चर्चा दिवसभर परिसरात होत होती.
यात दोन आरोपीना अटक केली तर एक आरोपी पोलीस वाहनातुन उडी मारून पसार झाला. दरम्यान पोलीस फिर्यादीमध्ये बालाजी फरसाणच्या पाठीमागे वेड्या बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळण्याचे ठिकाण दाखविण्यात आले.
तसेच क्लब चालकाचे नावच फिर्यादीत आले नाही. त्यामुळे क्लब चालकास आर्थिक तडजोडीतुन वगळण्यात आल्याच्या चर्चेने पोलीसांबद्दल नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.