सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार प्रा.डॉ तानाजी राऊ पाटील यांना जाहीर
पाथर्डी- प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे यांच्या १०० व्या जयंती निमित्त श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेच्या वतीने "सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार 2022" यासाठी संत साहित्य लेखकांना आवाहन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण 13 संत साहित्यिकांनी आपले संत साहित्यावरील ग्रंथ पाठवले होते. त्यातून पुरस्कार निवड समितीने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक, चिंतक प्रा.डॉ. तानाजी राऊ पाटील, (कोपरगाव) यांच्या "संत साहित्यातील सामाजिकता" या ग्रंथास राज्यस्तरीय उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार जाहीर केला आहे. या ग्रंथा मधून त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, यांच्या साहित्याचा सामाजिक अंगाने अभ्यास केलेला आहे. संत साहित्यातील मानववादी दृष्टी, अनुभवाला येणारे वैश्विकतेचे स्वरूप, मानवी जीवनातील उदात्तता लेखकाने उत्कृष्टपणे मांडलेली आहे. आधुनिक काळात समाज मनामध्ये संत साहित्य विषयी अभिरुची निर्माण करणारा हा ग्रंथ आहे. सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार २०२२, प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मा. आप्पासाहेब राजळे, शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे, विश्वस्त राहुल दादा राजळे,मार्गदर्शक मा.जे.आर.पवार, शिक्षण संस्थेचे सचिव आर.जे.महाजन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराचे वितरण दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी सहकार महर्षी स्व. दापाटील राजळे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात भागवताचार्य अशोकानंद कर्डिले महाराज, चिचोंडी पाटील यांच्या शुभहस्ते, दादा पाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथ नगर, येथे सन्मान पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.