बहुजन तरुणांना न्याय देण्यासाठी शिवसेना कायम पाठीशी- अंबादास आरोळे
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील आरपीआय चे ज्येष्ठ नेते अंबादास आरोळे यांनी युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो भिमसमर्थकासह शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सदर प्रवेश पुणे महिला आघाडी शहरसंघटिका सौ.सुदर्शना आर. त्रिगुनाईत यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना संपर्कप्रमुख संजय घाडी , सहसंपर्क प्रमुख डाँ. विजय पाटील , विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे व जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाने जाहीर प्रवेश घडून आणला.
अंबादास आरोळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती व भीमशक्ती चे स्वप्न साकार करण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला याचा मला आनंद होत आहे. पाथर्डी शिवसेना स्थापना पासून मी शिवसैनिक होतो. आज ही तेच रक्त सळसळत आहे. शिवसेनेचे ८०% समाजकारण व २०% राजकारण ही अखंड महाराष्ट्रातील मराठी व बहुजन तरुणांना न्याय देण्यासाठी शिवसेना कायम पाठिशी राहिली आहे.
उपस्थित प्रवेशामध्ये माणिकदौंडी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कांबळे , खादी ग्रामउद्योग चे माजी सभापती व विश्वकर्मा विराट संघटनेचे जिल्हाअध्यक्ष गोरक्ष चन्ने , सनी दिनकर , बबलू बोरुडे , आण्णासाहेब देवढे यासह हजारो पाथर्डी तालुक्यातील भिमसमर्थकासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मुंबई येथील कार्यालयात शिवबंधन व भगवा झेंडा देऊन स्वागत करण्यात आले.
पाथर्डी शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे व युवासेना शहरप्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे यांनी आरोळे यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अक्षय उराडे, बंडू हंडाळ, बबलू बोरुडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.