मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी केले जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुगंधी तंबाखू, बारीक सुपारी व मशीन असा एक लाख 21 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये गुरूवारी कोतवाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बापू राहिंज (वय 28 रा. भूषणनगर, केडगाव) व माहरूफ अजीज शेख (वय 22 रा. काटवन खंडोबा) अशी ताब्यात घेतल्याची नावे आहेत. केडगाव उपनगरातील भूषणनगरमध्ये राहिंज व शेख हे मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखू, बारीक सुपारीपासून मावा तयार करत होते. निरीक्षक संपत शिंदे यांना याची माहिती मिळाली. शिंदे यांनी उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार शरद गायकवाड यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने भूषणनगर परिसरातील ऑगस्ट कॉलनीमध्ये छापा घातला. या छाप्यादरम्यान आरोपी मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखू, बारीक सुपारीपासून मावा तयार करताना मिळून आले. पोलिसांनी वरील सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केेली.