महाराष्ट्र
साखर कारखान्याची एफआरपी जाहीर, वेळेत अदा न करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्याचा लाल यादीत समावेश
By Admin
साखर कारखान्याची एफआरपी जाहीर, वेळेत अदा न करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्याचा लाल यादीत समावेश
शेतकऱ्यांना समजण्यासाठी आयुक्तांची युक्ती, नियमितमध्ये ८ तर विलंबानामध्ये १३ कारखाने
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी देण्याची आर्थिक सक्षमता समजावी. या हेतूने नियमित, विलंबाने तसेच वेळेत एफआरफी अदा न करणारे कारखान्याची यादी हिरव्या,नारंगी व लाल रंगामध्ये प्रसिध्द करण्यात आली असून यामुळे लाल रंगाच्या यादीत वेळेत ऊसदराची रक्कम अदा न करणाऱ्या कारखान्याचा सामावेश करण्यात आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्या कारखान्याला ऊस घातल्यास आपल्यास वेळेत एफआरपी मिळेल हे समजण्यास मदत होणार आहे. दि.२४ शुक्रवार रोजी याबाबतचे परिपत्रक साखर आयुक्त, शेखर गायकवाड यांनी काढले आहे.
ऊस गाळप हंगाम २०२१-२२ हा दि.१५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जवळच्या साखर कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेली आहे. गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये रास्त व किफायतशीर ऊस दराची ( एफ.आर.पी. ) रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी विहीत कालावधीत अदा केलेली आहे , तर काही कारखान्यांनी विहित कालावधी उलटूनही एफ.आर.पी.ची रक्कम अदा केलेली नाही. शेतकऱ्यांकडून सातत्याने एफ.आर.पी. ची रक्कम कमी प्राप्त झाली.अगर प्राप्त झालेली नाही किंवा विलंबाने प्राप्त झालेली आहेत. अशा स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे व साखर आयुक्तालयाकडे वारंवार केल्या जातात. या तक्रारीमध्ये मुख्यत : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त रक्कमेचे आमीष दाखविणे. परंतु ती रक्कम न देणे, ऊस गाळपास नकार देणे, हंगामाच्या सुरुवातीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे व हंगामाच्या शेवटच्या महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवणे, अशा बाबी आढळतात.
काही निवडक शेतकऱ्यांना एफ.आर.पी.पेक्षा थोडी जास्त रक्कम देवून त्यानंतर बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्या संदर्भात सातत्याने विविध संघटनांमार्फत साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चे , उपोषण , धरणे इत्यादी आंदोलने होत असतात . काही कारखाने नेहमीच एफ.आर.पी. ची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना विलंबाने अदा करीत असतात . त्यामुळे अशा साखर कारखान्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालयास आर.आर.सी. आदेश निर्गमित करावे लागतात . त्याउलट काही साखर कारखाने वेळेवर व अचूक पद्धतीने ऊस उत्पादक शेतकन्यांना एफ.आर.पी.ची रक्कम अदा करीत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्याला सहज समजावे.
या हेतूने शेतकऱ्याला योग्य ती माहिती पुरविणेबाबत मंत्री सामितीच्या दि. १३ सप्टेंबरच्या बैठकीमध्ये चर्चा झाले. शेतकऱ्यांनी कोणत्या साखर कारखान्यास ऊसाचा पुरवठा करावा. याबाबत निर्णय घेणे शेतकऱ्यांना सोपे व सुलभ होण्याकरीता नियमित एफ.आर.पी. अदा करणारे , हंगामात थोड्या विलंबाने एफ.आर.पी. अदा करणारे व हंगाम संपूनही मुदतीत एफ.आर.पी. अदा न करणारे तसेच आर . आर.सी. आदेश निर्गमित झालेल्या कारखान्यांची माहिती ऊस पुरवठादार शेतकऱ्यांकरीता प्रसिद्ध आवश्यक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांची एफ.आर.पी. देण्याची आर्थिक सक्षमता समजावी. या हेतूने गाळप हंगाम २०२०-२१ या मागील ऊस हंगामातील माहिती पुणे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी परिपत्रक काढून कारखान्याची वस्तूनिष्ठ शेतकऱ्यांसमोर आणली आहे.
नियमित एफआरपी रक्कम अदा करणारे साखर कारखाने पुढीलप्रमाणे एक- १) लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वरी सहकारी साखर कारखाना लि. भेंडे बुद्रुक ता. नेवासा. २) प्रसाद शुगर अँण्ड अलाईड अँग्रो प्रॉडक्टस लि.सडे वांबोरी रोड ता. राहुरी.३) श्री गणेश सहकारी साखर कारखाना गणेशनगर ता. राहता ( डॉ.व्ही.व्ही. पाटील ससाका लि.). ४) कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि. कोळपेवाडी ता. कोपरगाव. ५) मुळा सहकारी साखर कारखाना लि. सोनई ता. नेवासा. ६) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. पो. अमृतनगर ता. संगमनेर. ७) सहकार महर्षी शंकरराव कोल्हे ( संजीवनी ) सहकारी साखर कारखाना लि. शिंगणापुर ता. कोपरगाव. ८) श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि. वृध्देश्वर ता. पाथर्डी.
विलंबाने एफआरपी रक्कम अदा करणारे कारखाने पुढीलप्रमाणे - १) अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्तीनगर ता. अकोले. २) अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगर ता. श्रीरामपूर. ३) कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा. ४)पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि. पो. प्रवरानगर ता. श्रीरामपूर. ५) नागवडे दि श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा. ६) श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. बोधेगाव ता. शेवगाव. ७) बी. बी. तनपुरे दि राहुरी सहकारी साखर कारखाना लि. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी.( डॉ. व्ही. व्ही. पाटील ससाका लि.). ८) इंडिकॉन डेव्हलपर्स प्रा.लि. मु. पो. अंबिकानगर ता. कर्जत,( श्री अंबालिका शुगर्स प्रा. लि.). १०) जय श्रीराम शुगर अँन्ड अँग्रो प्रोडक्ट लि. हादगाव ता. जामखेड. ११) गंगामाई इंडस्ट्रीज अँन्ड कन्स्ट्रक्शन लि. नजीक बाभूळगाव ता. शेवगाव. १२) श्री क्रांती शुगर अँन्ड पॉवर लि. पो. देवीभोयरे तालुका पारनेर. १३)युटेक शुगर प्रा. लि. कौठे मलकापुर ता. संगमनेर.
एफ आर पी वेळेत आधार न केलेले व आरसी निर्गमित केलेले कारखाने पुढीलप्रमाणे १) पियुष शुगर अँण्ड पॉवर प्रा. लि. वाळकी, ता. अहमदनगर.
Tags :
70878
10