कराळे कोचिंग क्लासेसला बेस्ट कोचिंग क्लास अवार्ड मिळाल्याबद्दल सत्कार
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे गावचे भूषण प्रा. सुनील दिगंबर कराळे सर व प्रा. बबन दिगंबर कराळे सर यांचे अहमदनगर येथील कराळे कोचिंग क्लासेसला बेस्ट कोचिंग क्लास अवार्ड ने नुकतेच मुंबई येथे गौरविण्यात आले.यानिमित्ताने त्यांचा भव्य सत्कार व गौरव समारंभ कामत शिंगवे येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब, व शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिका ताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन , सदस्य, ग्रामस्थ , आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.