पाथर्डी व नगर तालुक्यातील 'या' गावांना ४ कोटी ७३ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजुर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी- पाथर्डी मतदारसंघातील कात्रड, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, मोहोज बु, मोहोज खु, मांडवे, तिसगांव, कोल्हार, त्रिभुवनवाडी, सोमठाणे, निरी, बैजुबाभुळगांव, भोसे, तसेच नगर तालुक्यातील शेंडी व पांगर येथील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने ४ कोटी ७३ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मतदार संघातील राहुरी मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वरदान ठरणाऱ्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे, असेही तनपुरे म्हणाले.