पाथर्डी- पुष्पहार अर्पण करून शिवसंग्राम संघटनेची गांधीगिरी
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तहसील कचेरीकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून, तो दुरुस्त करण्यासाठी शिवसंग्राम च्या वतीने खड्ड्याला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
त्या परिसरामध्ये तहसील कडे जाणारी दोन रस्ते आहेत .त्यामध्ये गोरे मंगल कार्यालयाकडुन एक रस्ता व दुसरा मेन रोड कडुन येणारा एकआहे .परंतु दोन्हीकडुन तहसील कडे, पाथर्डी पोलीस स्टेशन कडे तसेच महसूल भवनकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून, या ठिकाणी अनेक सेतू कार्यालय ,जमीन खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी तसेच आधार कार्ड दुरुस्ती केंद्र व शासकीय कामासाठी बाहेर गावावरून अनेक लहान मोठे पुरुष व स्त्रिया,अपंग व्यक्ति येत असतात .परंतु त्या रस्त्याने पायी चालता देखील शक्य राहील नाही .तो रस्ता दुरुस्त व्हावा व त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांच्या नेतृत्वाखाली त्या खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
यावेळी परिसरातील छोटे व्यवसायिक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व रस्ता दुरुस्ती हवी ,ही मागणी केली.
यावेळेस शिवसंग्रामचे प्रकाश कचरे, भारत भोईटे,मनसेचे शैलेश शिंदे, बाळासाहेब केदार, आविनाश हाडके, किशोर लांडगेआदी उपस्थित होते.