पाथर्डी - अतिक्रमण विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण
पाथर्डी - प्रतिनिधी
तहसिलदारांनी खुला करुन दिलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करुन तारेचे कुंपन घालुन रस्ता
अडविणा-या शेतक-यावर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील करडवाडी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. कारवाई होत नाही तोपर्यत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
या आंदोलनामध्ये करडवाडी येथील शेतकरी संतोष जाधव, बबन जाधव, संदिप जाधव, सुभाष जाधव, संजय जाधव, रामचंद्र कुटे, पारुबाई जाधव, भामाबाई जाधव, अरुणा ढाकणे, शोभा कुटे, त्रींबक कुटे, दिलीप गर्जे, संगिता जाधव, सविता जाधव, महादेव गर्जे यांनी गुरुवारी तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
मंडलअधिकारी व तलाठी यांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन रस्ता अडविलेल्या ठिकाणी पाहणी केली. त्याचा अहवाल तहसिलदारांना दिला आहे. रस्ता खुला करुन मिळावा अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी भुमिका शेतक-यांनी घेतली आहे. तहसिलदारांच्या आदेशाचा अवमान करण्याचा गुन्हा संबंधितावर नोंदवून, दमदाटी कारण्याऱ्यांचा बंदोबस्त करा अशी शेतक-यांची मागणी आहे.