जिल्ह्यातील ह्या गावात बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह हजारो कोंबड्यांची..
नगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात हळू-हळू आपले हात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वासुंदे गावातील मृत्यू कोंबड्यांचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव आला.
त्यामुळे रविवारी दुपारपासून वासुंदे गावातील दोन मोठ्या पोल्ट्री फार्म मधील हजार कोंबड्या आणि शेतकऱ्यांच्या परसातील आले कोंबड्याची पशुसंवर्धन विभागाने विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे या मोहिमेत जिल्हा परिषद बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सहभागी झाले होते पारनेर तालुक्यातील वासुंदे गावातील कोंबडा काही दिवसांपूर्वी मृत झाल्या होत्या.
कोंबड्यांची नमुने पुण्याच्या आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.अहवाल शनिवारी रात्री उशिरा बर्ड फ्लू यामुळे रविवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुनील तुंबारे आणि राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची परवानगी घेऊन बर्ड फ्लू चा अहवाल पॉझिटिव आलेल्या वासुंदे गावात धाव घेतली.
अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या भागात दोन मोठ्या पोल्ट्री व शेतकऱ्यांकडे मोठ्या संख्येने पडसाती कोंबडी आहे त्या सर्व कोंबड्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.