मध्यराञीपासून एस टी ची भाडेवाड; नवे दर लागू होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुंबईसह राज्यात भाडेवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) घेतला आहे. एसटीची ही भाडेवाढ १७ टक्के असून आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाकडून दरवाढीबाबत विचार केला जात होता. या पार्श्वभूमीवर अखेर महामंडळाने आज मध्यरात्रीपासून तिकिटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 'केंद्र सरकारचे डिझेल दरावर नियंत्रण नसल्याने हे दर सातत्याने वाढत आहेत. परिणामी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे,' असे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.