आ.रोहीत पवार पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
जामखेड कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या आपत्तीत आमदार रोहित पवार हे मदतीला धावले आहेत. गेले तीन दिवस या आपत्तीग्रस्त भागात स्वतः चिखल तुडवत त्यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याबरोबरच चादरी, बिस्कीटे, सॅनिटरी नॅपकिन्स, मॅगी नूडल्स आदी विविध अशा जीवनावश्यक असलेल्या सहा ट्रक वस्तूंचेही वाटप केले.
'कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन', 'बारामती ऍग्रो' आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सहा ट्रक (सुमारे २ लाख नग) आवश्यक साहित्याची मदत केली. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सातारा जिल्ह्यातील पाटण तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांना देण्यासाठी स्वतः जाऊन ही मदत तेथील प्रशासनाकडे सुपूर्द केली. यामध्ये सोलापुरी चादरी, बिस्कीट पुडे, पाण्याच्या बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन्स, क्लोरीन पावडर, मॅगी नुडल्सची पॅकेटे, वॉटर बॉटल (MT), माचीस, मास्क अशा सुमारे दोन लाखाहून अधिक वस्तूंचा समावेश आहे.