चार डाॕक्टरचा तरुणीसोबत झिंगाट डान्स करत धिंगाणा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बोल्हेगाव उपनगरात साईदर्शन बिल्डिंग जवळ एका तरूणीसह चार जण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डान्स करत धिंगाणा घालत असल्याची माहिती स्थानिकांनी तोफखाना पोलिसांना दिली. रात्र गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले. तरूणीसह चौघे बेफान नाचत सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी चारही व्यक्तींना ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित चार व्यक्तींमध्ये तीन डॉक्टर असून एक नर्स असल्याची माहिती आहे. पोलिसांना पाहताच या मंडळींची त्रेधा उडाली. ओळख लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अखेर निरीक्षक सुरसे यांना या झिंगलेल्या डॉक्टर मंडळींना थेट तोफखाना पोलीस ठाण्यात आणावे लागले. मोठी कारवाई होईल आणि इज्जतीचा पंचनामा होण्याच्या भीतीने त्यांनी शहरातील काही डॉक्टरांना साकडे घातले. त्यांची ओळख पटल्यानंतर नोंद घेत पोलिसांनी एक तरूणी आणि तीन तरूण अशा चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत पुन्हा असे काही करणार नाही, या लेखी जबाबावर सोडून देण्यात आले.