आमच्यावर टिका करणे हास्यास्पद- आ.मोनिका राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी ‘तालुक्यातील आकोला गावातील नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय पातळीवर गेले. त्यांच्या बद्दल आम्हाला आजही अभिमान व आदर कायम आहे. मात्र ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा व निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर टीका करणे हास्यस्पद आहे,’ अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी नाव न घेता विरोधकांवर केली.
तालुक्यातील खेर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, वसुजळगाव व सुसरे येथील पावणेपाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन व उद्घाटन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होत्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जि.प.सदस्य राहुल राजळे, सुनिता दौंड, विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण आदी उपस्थित होते.