महाराष्ट्र
4377
10
अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल,हाॕटेल राञी दहा पर्यत सुरू राहणार
By Admin
अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल,हाॕटेल राञी दहा पर्यत सुरू राहणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्तराँट, उपहारगृहे, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून हाेणार आहे.
उपहारगृहे ः खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मास्क अनिवार्य, कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक राहील. लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या हव्यात. पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
दुकानांना मुभा ः जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने, शाॅपिंग माॅल्स दिवस-रात्री १०.०० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचाऱ्यांचे लसीकरणाच्या पूर्ण असावे. खेळाडूंना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी दोन खेळाडूंची मर्यादा असेल.
इतर कार्यालये ः सर्व आस्थापना आणि खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र कार्यालयांमध्ये एका सत्रात कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.
विवाह सोहळे ः खुल्या प्रांगणातील/लॉनसाठी २००, तर बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यांसाठी १०० लाेकांची मर्यादा असेल. हे बंदच ः जिल्ह्यातील सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. तसेच, राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इत्यादीवरील निर्बंध कायम राहतील.
Tags :

