महाराष्ट्र
11084
10
नवजीवन स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त सिन्नर होम मिनिस्टर चा उत्साह नाचत
By Admin
नवजीवन स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त सिन्नर होम मिनिस्टर चा उत्साह नाचत गात अन् कलागुणांचे दर्शन घडवीत बक्षिसांची लयलूट
सिन्नर तालुका न्यूज24 live नेटवर्क
श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल सिन्नरच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संस्थेच्या चेअरमन सौ विजयाताई देशमुख( बडे मॅडम) संस्थेच्या संचालिका शिरीन (दीदी )तसेच संस्थेच्या जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी सौ मंगला पवार मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या यावेळी संगीत शिक्षिका कुमारी गायत्री मांडे यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमास सुरुवात झाली संस्थेच्या चेअरमन सौ विजयाताई देशमुख (बडे मॅडम) यांच्या हस्ते आत्ताच सुरू असलेल्या इंडियाज गॉट टॅलेंट या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमाचे सेमी फायनल लिस्ट होऊन सिन्नर चे नाव जगभर पोहचून घवघवीत यश मिळवणारे हाय रामा या त्यांच्या व्हिडिओला करोडो लाईक्स मिळणारे सिन्नरचे भूमिपुत्र श्री हर्षद किसन गोळेसर सौ दुहिता हर्षद गोळेसर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपले गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनी सौ शितलताई सांगळे मा. जि. प.अध्यक्षा ,सौ मनीषा विठ्ठल राजे उगले ,सौ मोनाली हर्षद देशमुख, नगरसेविका सौ योगिता हरिभाऊ वरंदळ , सौ ज्योती पंकज मोरे ,आशा काशिनाथ करपे, सौ सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, सौ मनीषा योगानंद गवळी ,सौ प्रणाली उदय गोळेसर,सौ स्वाती शरद हगवणे, सौ सुवर्णा कैलास कुंदे ,सो स्वाती सागर भाटजिरे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आदर्श शिक्षिका सौ सविता शांताराम देशमुख, सौ वर्षा मधुकर काळे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या कार्यक्रमात एरवी कौटुंबिक जबाबदाऱ्या मध्ये व्यस्त असलेल्या महिला वर्गाने काही क्षण निवांत होत मनोरंजनात्मक खेळामध्ये सहभाग नोंदविला आपल्या कलागुणांचे दर्शन घडवितांना बक्षिसांची लयलूट केली नवजीवन स्कूल आयोजित सिन्नर होम मिनिस्टर या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होताना महिला वर्गाकडून जल्लोष करण्यात आला निवेदक भूषण कापडणे गीत गुंजन ऑर्केस्ट्रा यांच्याकडून सुरुवातीस सुरमय गाण्याच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले गायक भूषण कापडणे यांनी आपल्या सुरेल आवाजातून मराठी गाणे गाताना सर्व महिलांना संगीताच्या तालावर थिरकले यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली विविध खेळांच्या फेऱ्यांमध्ये आपली गुण कौशल्य दाखवताना महिलांनी मानाच्या पैठणीसाठी दावेदारी सादर केली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात शेवटच्या फेरीपर्यंत सुरस बघायला मिळाली या या कार्यक्रमात उत्कृष्ट वेशभूषित चे बक्षीस सौ स्वाती काळे ,सौ मनीषा गीत यांना मिळाले सामूहिक नृत्यांमध्ये सहभागी असलेले सौ वर्ष ताजने ,सौ प्रियंका छल्लारे ,सौ चित्रा काकड ,सौ अर्चना ब्राह्मणे , सौ रवीना नवले ,सौ रेखा भास्कर यांना बक्षिसे मिळाली विविध खेळातील स्पर्धेतील विजेते -सौ सारिका सोनवणे, सौ कल्याणी पेटकर ,सौ वर्षा निरगुडे, सौ अलका शेळके ,सौ आशा कराड, सौ रवीना नवले ,सौ स्वाती काळे, सौ ज्योती कल्याणी, सौ जयश्री भोसले ,सौ मोहिनी गांजवे ,यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली व मानाची पैठणी विजेती सौ अश्विनी बाकळे या विजेत्या ठरल्या त्यांना इंडिया गॉट टॅलेंट विजेते दुहीता हर्षद गोळेसर,सौ विजयाताई देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन श्री नरेंद्र वाघ सर सौ योगिता भटजीरे मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थितीत मान्यवर श्री महेंद्र विंचूरकर , श्री अरूण भालेराव ,श्री शरद हगवणे समृद्धी इलेक्ट्रिकल, श्री कैलास कुंदे समाधान हार्डवेअर, श्री एस बी देशमुख सर सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ ,श्री एल डी बेनके सर , संस्थेचे शिक्षण अधिकारी श्री बी. बी. पाटील सर, शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी ,सौ सविता फड, सौ प्रीती गुजराथी, सौ सुमन बिचवे ,सौ पायल दुबे, श्री शरद शिंदे,श्री राहुल चव्हाण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियांका देशपांडे यांनी केले
Tags :
11084
10




