शेवगांव तालुका हादरला फक्त मुलीशी शेवगांव बसस्थानकावर बोलणाऱ्या युवकाचा मारहाणीत मृत्यू
शेवगाव- प्रतिनिधी
मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती. जखमीमधील एका युवकाने दुसऱ्या दिवशी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. या घटनेतील जखमीचा अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोखंडी रॉडने मारहाण फिर्यादी व त्याचे मित्र मोटारसायकल वरून शेवगाव बसस्थानक येथे गेले होते. बसस्थानकात मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन तिघा मित्रांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शवविच्छेदना नंतर त्याच्यावर सायंकाळी उशिरा त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शेवगांव शहरातील अनेक महाविद्यालये ज्युनियर कॉलेज माध्यमिक शाळा च्या बाहेरील परिसरात सडक सख्याहरींचा वावर असतो त्याचा त्रास मुलींना तिच्या पालकांना आणि पर्यायाने शालेय आणि महाविद्यालयीन प्रशासनाला चिंतेत टाकणारा आहे यातूनच अशा गंभीर घटना घडण्याची पार्श्वभूमी तयार होते जबाबदार कोण ??? पोलिसांचं दामिनी पथक पालक शिक्षक समिती कमी पड्तायेत कां