शिक्षकाने बायको आणि मुलीसह रेल्वे रुळावर संपवलं आयुष्य, मृतदेहांचे झाले तुकडे, पोलीसही हादरले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
परभणीमधून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची रेल्वे समोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड परिसरामध्ये गोदावरी नदीवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. एका शिक्षक कुटुंबाने आत्महत्या केली. मसनाजी तुडमे असं मृत शिक्षकाचं नाव आहे.
गंगाखेड शहरातील ममता महाविद्यालयात मसनाजी तुडमे हे शिक्षक कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह स्वतःला रेल्वे पटरी खाली झोकून देत जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमध्ये शिक्षक मसनाजी तुडमे, पत्नी रंजना तुडमे, मुलगी अंजली यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शिक्षक असलेल्या मसनाजी तुडमे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, पत्नी मुलीसह आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तुटमे कुटुंब हे अहमदपूर तालुक्यातील कीन्ही गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी आपला आयुष्य संपवण्यामुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.