महाराष्ट्र
11630
10
श्री रत्न जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, शिक्षक वृंद
By Admin
श्री रत्न जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, शिक्षक वृंद कृतज्ञता सोहळा
२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांना २००२-०३ च्या काळात गेल्याची अनुभूती
एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींचा आनंद गगनात मावेना
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयातील माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा २४ वर्षानंतर नुकताच पार पडला.
प्रवेशद्वारावर औक्षण व पुष्प वर्षाव करून सर्व गुरुजनांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात
सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी माजी प्राचार्य प्रकाश शेवाळे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, माणिकदौंडी सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक
विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची व बिकट होती.या भागातील पालकांचा मुख्य व्यवसाय हा शेती व ऊस तोडणी हा आहे. दिवाळीनंतर पोट भरण्यासाठी अनेक कुटुंब राज्याच्या विविध जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरीत होतात. अनेक निरागस लेकरं ऊन, वारा,पाऊस याचा विचार न करता अनवाणी पायांनी पाऊलवाट तुडवत शाळेत यायचे.काही मुलांचे फाटलेले कपडे, दुपारच्या जेवणावेळी फडक्यात बांधलेली भाकर त्यांच्या परिस्थितीची व आमच्या जबाबदारीची जाणीव करून देत होती.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना आम्ही कुठेही कमी पडलो नाही. म्हणून आज अनेक क्षेत्रात आमचे विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांचा संघर्षमय प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. शांत,संयमी व संस्कारशिल पिढीच या राष्ट्राची खरी संपत्ती आहे.
स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने चांगले विचार समाजात तुम्ही पेरत आहात. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली याचा आनंद व अभिमान वाटतो.
कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर व दिमाखदार केले होते.सर्व गुरुजनांना सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.आपल्या भावना वक्त करताना सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना २००२ च्या काळात गेल्याची अनुभूती येत होती, एकच आलेल्या मित्र-मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना.
कार्यक्रमाच्या दर्शनी भागात काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
काही दिवंगत गुरुजनांना देखील याठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुपारच्या सत्रात गप्पा,गोष्टी गाणीसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील नियोजन केलेले होते. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह सर्वांना नाष्टा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी आश्रम शाळेस फॅन सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री तिलोक जैन चे प्राचार्य अजय भंडारी, श्री रत्न जैन चे मुख्याध्यापक राजाराम माळी, पर्यवेक्षक अशोक गर्जे,
बबन फुंदे,पोपटलाल गांधी,समाधान आराख, राजेंद्र चव्हाण,रेवणनाथ वायकर,संजय शिंदे, सुभाष खेडकर,अनिल पटवा,मनिषा मोरे,सदानंद सुतार व महेंद्र राजगुरू हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल शेळके,अध्यक्ष निवड प्रकाश भोसले, सूत्रसंचालन सचिन चव्हाण तसेच आभार किरण साबळे यांनी मानले.
Tags :
11630
10




