महाराष्ट्र
35767
10
राजळे महाविद्यालयात अर्थसंकल्प- २०२६' याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत
By Admin
राजळे महाविद्यालयात अर्थसंकल्प- २०२६' याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपात मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान
पाथर्डी- तालुका- पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे- दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर, तालुकाः पाथर्डी, जिल्हाः अहिल्यानगर मधील वाणिज्य शाखा व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 'अर्थसंकल्प- २०२६' या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
एस.व्ही.के.टी. कॉलेज, देवळाली कॅम्प-नाशिक येथील प्राध्यापक विजय गायकवाड यांनी 'अर्थसंकल्प- २०२६' याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ.आर. जे. टेमकर यांच्या हस्ते प्राध्यापक डॉ.विजय गायकवाड यांना शाल, श्रीफळ, पुस्तक,पुष्पगुच्छ व महाविद्यालयाचे नियतकालिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राध्यापक विजय गणपत गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारचे उत्पन्न कोणते व खर्च कोणते याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तरपणे पीपीटी च्या माध्यमातून समजून सांगितली. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? अर्थसंकल्पीय तूट कशाप्रकारे भरून काढता येईल याबाबतची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय व निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी माहिती उपलब्ध करून दिली. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कशाप्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे ते समजून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. आर. जे. टेमकर होते. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख यांनी केले. अध्यक्षीय सूचना श्रीमती सरोदे रामेश्वरी यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कुमारी वांढेकर साक्षी दिलीप यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. दळवे दशरथ यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाला कार्यालयीन अधीक्षक श्री विक्रमराव राजळे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर व्याख्यानासाठी प्राध्यापक खेडेकर देविदास, श्रीमती सातपुते स्वाती, श्रीमती वीर कविता, श्री.लवांडे महेश यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी प्राध्यापक चंद्रकांत पानसरे, प्राध्यापक राजकुमार घुले,आयक्यूएसी कॉर्डिनेटर प्राध्यापक राजू घोलप उपस्थित होते. द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थिनी कुमारी अंजुम समीर शेख, श्री घोरपडे निखिल आप्पासाहेब यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर व्याख्यानाचा लाभ सहभागी ६८ विद्यार्थी व ०९ प्राध्यापकांना झाला.
Tags :
35767
10




