माजी आमदार शेखरभाऊंनी घेतली किटली विरोधकांची हातभर फाटली
शेवगाव- प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला राज्यातील मोठं मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी बरोबरच शेवगांव पाथर्डी मतदार संघ पिंजुन काढला अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणुन ओळखले जाणारे शेखरभाऊ यांनी आपले पत्ते ओपन न केल्याने विरोधक संभ्रमात राहिले शेवट्याच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतील अश्या अटकळी अनेक रथी महारथी मनातल्या मनात मांडे खात होते त्यानी उमेदवारी करु नये म्हणुन अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते काहींनी कट्टर घुले समर्थकांना टोमणे मारायला सुद्धा सुरवात केली होती पण अहिल्यानगर जिल्ह्यात "भाऊंचा खटका" पूर्वीपासूनच फेमस आहे अर्ज माघारीच्या दिवसही शेवगांव तहसील कार्यालयात काही बगळे भाऊंची दात घासून वाट पाहत होते दुपारी तीन नंतर त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते काही म्हणत होते शेखर भाऊंनी जर अपक्ष उमेदवारी केली तर "मी मिशा भादरीन" ते आता कोणत्या बिळात जाऊन बसले दिसतच नाहीत
शेवगांव नेवासा आणि आताचा शेवगांव पाथर्डी हा मतदारसंघ पूर्वीपासूनच क्रांतिकारी राहिला आहे चांगल्या चांगल्याचा टांगा पलटी आणि घोडे फरार केले आहेत शेवगांव शहराचा गंभीर पाणी प्रश्न खराब रस्ते कोट्यवधींची झालेली निकृष्ट दर्जाची कामे विकासकामे करताना सत्ताधाऱ्यांकडून शेवगांव आणि पाथर्डी असा झालेला भेदभाव शेतकऱ्यांचे प्रश्न याभोवतीच यंदाचे इलेक्शन फिरणार असं दिसते.