बाबुजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी वाचन स्पर्धा
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्रजी वाचन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
इंग्रजी वाचनामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, शब्दसंपदा वृद्धिंगत व्हावी तसेच वाचन कौशल्य विकसित व्हावे, या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना बेस्ट रीडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. मधुरा बंग,द्वितीय क्रमांक कु. लाटणे वैष्णवी तर तृतीय क्रमांक कु. खाडे रोहिणी यांनी पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड.सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. बी. ए. चौरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचे आयोजन प्रा.मन्सूर शेख यांनी केले. या स्पर्धेस कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. दिलदार पठाण यांनी केले.